"अस्तित्वातील शिक्षणपद्धती अन वास्तवातील जग"

"अस्तित्वातील शिक्षणपद्धती अन वास्तवातील जग"





महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून या जगाच्या बाजारात आल्यावर असं लक्षात आलं, की आपण घेतलेलं शिक्षण आणि वास्तवात असणार जग यामध्ये काही साम्य नाही. मग मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला!
खरोखरच आपण घेतलेलं शिक्षण हे एकविसाव्या शतकाला पूरक अस शिक्षण आहे का?
समोर वास्तवात असणार जग म्हणजेच वर्तमानातील जग आणि आपण घेतलेल शिक्षण या दोन्ही गोष्टींचा  काडी मात्राचाही संबंध आणि कोणताही ताळमेळ नाही. दिल जाणार शिक्षण आणि वास्तवात असणार जग म्हणजे परस्पर विरोधी दृश्य (३६) असच आपल्याला जाणवत.
काल्पनिक स्वरूपाच जग आणि त्यावर आधारित शिक्षण पद्धती म्हणजे स्वतः बरोबरच आपल्या देशाला काळाच्या ओघात माग लोटनं होय. जे जग अस्तित्वातच नाही त्याला उगाचच तोंड का द्या.

जग ज्या झपाट्यान बदलत चाललं आहे ते बदल आपल्याला शालेय शिक्षणात दिसत नाहीत.
म्हणूनच आपल्या देशामध्ये बेरोजगारीच प्रमाण वाढत चाललं आहे अस मला वाटत आणि यात काही दुमतही  नाही.
वास्तवातील परिस्थिती,
आज इंजिनिअर, मेडिकल, वकिल या क्षेत्रामधील विद्यार्थी आपल्याला UPSC, MPSC, सैन्यभरती आशा विविध क्षेत्रांकडे वळलेली दिसत आहे.
याच कारण काय?
तर उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळत नाही.
मग आपला मार्ग पुन्हा बदलावा लागतो.
म्हणजे आयुष्यतील तीन-चार वर्षे आपण घेतलेल्या उच्च शिक्षणासाठी वाया घालवली असाच याचा अर्थ होतो.
या परीक्षा देऊनही पुढे आपल्याला नोकरी मिळेल का नाही याचीही शास्वती नाही.
म्हणजे आयुष्यातील आणखी किती वर्षे आपण या शिक्षणासाठीच वाया घालवायची.

नव नवीन क्षेत्र कोणती आहेत हे जगाच्या बाजारात पडल्याशिवाय आपल्याला कळत नाही.
विद्यार्थ्यांना ते जर आगोदरच समजलं तर आयुष्यातील वाया जाणारा बराच वेळ ते वाचवू शकतात.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता बदलत जाणार जग आणि उदयास आलेली नवनवीन क्षेत्र शिक्षणात येणं गरजेचं आहे. अशा गोष्टींची विद्यार्थ्यांना ओळख करून देण गरजेचं आहे.
विद्यार्थ्यांना आज अर्थविषयक शिक्षणाची गरज आहे.
अस हे बाहेरच जग पाहिल्यानंतर लक्षात येत.

आजची ही भयान दृश्य म्हणजेच बेरोजगारी आणि नोकरीसाठी धडपडणारा मी आणि माझ्यासारखे अनेक युवक पाहून सुचलेलं शब्दात उतरलं आहे.

अक्षय पाटील

टिप्पण्या