पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"अस्तित्वातील शिक्षणपद्धती अन वास्तवातील जग"

इमेज
"अस्तित्वातील शिक्षणपद्धती  अन  वास्तवातील जग" महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून या जगाच्या बाजारात आल्यावर असं लक्षात आलं, की आपण घेतलेलं शिक्षण आणि वास्तवात असणार जग यामध्ये काही साम्य नाही. मग मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला! खरोखरच आपण घेतलेलं शिक्षण हे एकविसाव्या शतकाला पूरक अस शिक्षण आहे का? समोर वास्तवात असणार जग म्हणजेच वर्तमानातील जग आणि आपण घेतलेल शिक्षण या दोन्ही गोष्टींचा  काडी मात्राचाही संबंध आणि कोणताही ताळमेळ नाही. दिल जाणार शिक्षण आणि वास्तवात असणार जग म्हणजे परस्पर विरोधी दृश्य (३६) असच आपल्याला जाणवत. काल्पनिक स्वरूपाच जग आणि त्यावर आधारित शिक्षण पद्धती म्हणजे स्वतः बरोबरच आपल्या देशाला काळाच्या ओघात माग लोटनं होय. जे जग अस्तित्वातच नाही त्याला उगाचच तोंड का द्या. जग ज्या झपाट्यान बदलत चाललं आहे ते बदल आपल्याला शालेय शिक्षणात दिसत नाहीत . म्हणूनच आपल्या देशामध्ये बेरोजगारीच प्रमाण वाढत चाललं आहे अस मला वाटत आणि यात काही दुमतही  नाही. वास्तवातील परिस्थिती, आज इंजिनिअर, मेडिकल, वकिल या क्षेत्रामधील विद्यार्थी आपल्याला UPSC, MPSC, सैन्यभर...